अहिराणी लोककथा – लक्षुमी आन अवदसा

अहिराणी लोककथा – लक्षुमी आन अवदसा लक्षुमी आन अवदसा या दोन बहिनी. दोनीस्ले शेजारशेजारना घरस्मा देयेल व्हतं. लक्षुमीनं घर मोठं-शिरीमंत, एकत्र कुटुंब. मोठी शेतीवाडी, डाळिंबना बागं आन द्राक्षास्ना मळा. रामपारात उठीसन लक्षुमी कामले लागे. दारना आडे ठेयेल कुंचा काढीसन सरं घर झाडे. आंगनमा सडारांगोळी काढे. मंग सरास्ले न्ह्यारी आन पोर्‍यास्नी तयारी. मंग दुपारनं जेवण. मंग…