अहिराणी

अहिराणी कविता)

तो मराठी शिक्ना
त्याले अहिरानी बोलानी
लाज वाटाले लाग्नी

तो हिंदी शिक्ना
त्याले मराठी बोलानी
लाज वाटाले लाग्नी

तो इंग्रजी शिक्ना
त्याले हिंदी बोलानी
लाज वाटाले लाग्नी

बाप बोल्ना भडविना!
त्या मार्वाडी-गुज्राथी
लोकेस्ले देख
त्या कित्ला भी शिक्नात
तरी त्यास्ले
सोतानी भाषा बोलानी
लाज नही वाटस
आप्ला लोकेसशी
आप्ली सोतानीच
भाषा त्या बोल्तस

पो-या!
ध्यान्मां ठेव
दुन्यामां त्याच
मोठा व्हयनात
जेस्नी सोतानी भाषाना
अभिमान बाळगा

शिकीस्नी तू एवढा
शाना समजस्ना सोताले
तर मंग तुनी सोतानी
नवीन भाषा
तयार करी दखाड
मंग म्हण्सू मी तुले
खरा शाना-शिकेल

भाषाना शोध भाऊ!
प्रयोगशाळामां नही लागस
भाषा खेत्मां नही पिकस
भाषा कारखानामां भी
नही तयार व्हस
भाषा म्हंजे समाज्ना डागिना
पन हाऊ डागिना
कोन्ता सोनारना दुकान्मां भी
नही तयार व्हस
तो समाज्मां तयार व्हस
आणि त्याले तयार व्हवाले
शेकडो हजारो वरीस लाग्तस
म्हनीस्नी सोतानी भाषा अस्नं
हाई लाज वाटानी नही
अभिमाननी गोट शे

‘अहिरस्नी रानी
ती अहिरानी!’
दुन्यामां आपुनच शेत
जेस्नी आप्ला भाषाले
रानीना मान दिन्हा
धुळे, जळगाव,
नंदुरबार नि नाशिक
असा चार जिल्हास्वर
ती राज करस
येना खेरीज
गुज्राथ नि मध्यप्रदेना
काही भागमां भी
तिन्ही हुकूमत चालस

आखो एक गोट
सांगी ठेवस
नीट आइक
इंग्रजी मराले लाग्नी
तरी तिले जगाड्णारा शेत
हिंदी मराले लाग्नी
तरी तिले वाचाड्णारा शेत
मराठी मराले लाग्नी
तरी तिलेबी तगाड्णारा शेत
पण माले सांग
‘आभीर’ लोकेस्नी
मराले टेकेल अहिरानीले
जगाड्नारा, वाचाड्नारा, तगाड्नारा
खान्देशीस सीवा कोण शेत?

तुले वाटस व्हई
ती धड्ली व्हई गई
ती धड्ली-बिड्ली नही व्हयनी
येडा! तुम्नासारखा
शिकेल सवरेल पोरेस्ले
तिनी लाज वाटस
म्हनीस्नीच तीनी
हाय खाइस्नी
बिस्तर पक्डेल शे
नही ते, बहिनाबाईनी
हाइ मायबोली
इत्ली कम्जोर थोडी शे
तिले दवापानीनी गरज नही
तिले फकत पिरीम जोयजे
तुले खोटं वाटस व्हई
ते तु तिले
“वं मनी माय”
अशी हाक जरी मारी
तरी ती उठी बशी

अरे! तुम्ना हात्मां
सोशल मिडियासारखं
साधन शे
अहिरानीनी वेबसाईट
तयार करिस्नी
तिनामधलं
लोकसाहित्य, लोकगीतं,
म्हणी, वाक्प्रचार
येन्हा खेरीज
तिना इतिहास, भूगोल
तिनी संस्कृती
हाई सम्दी माहिती
त्यावर टाकीस्नी
या रानीमायनी जिंदगी
तुमी वाढावू शक्तस

दखा गड्यास्वन!
आप्ली धट्टीकट्टी मायले
जगाडानं का मारानं
हाई आते
तुम्ना पीढीना हात्मां शे
आमी सांगानं काम करं
येना उपर तुम्नी मर्जी

Leave a comment